‘सरकार सतर्क असतं तर….’; ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर ठेवलं बोट

| Updated on: Jul 20, 2023 | 1:31 PM

याचदरम्यान जे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपये आर्थिक मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. याचदरम्यान या घटनेवरून आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे.

रायगड, 20 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने राज्यात दुखाचे वातावरण आहे. तर सध्या बचावकार्य सुरू झालं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादा भुसे हे दुर्घटनास्थळावर बाचवकार्यावर लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान जे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपये आर्थिक मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. याचदरम्यान या घटनेवरून आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं आहे. तर यावरून आता ठाकरे गटातील नेते आमदार सचिन आहिर यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या घटनेच्या आधी आम्ही रायगड बाबत विचार करांवा हे सांगत होतो. पण तसं केलं गेलं नाही. सरकार सतर्क असतं तर ही दुरदैवी घटना घडली नसती अशी टीका केली आहे.

Published on: Jul 20, 2023 01:31 PM
इर्शारवाडीवर डोंगर कोसळला; मदतीसाठी स्थानिक तरुणांनी धाव घेतली!
“इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मोफत धान्यपरुवठा केला जाणार”, छगन भुजबळ यांची घोषणा