‘महाराष्ट्रात ED, CD फक्त मराठी माणसाला लागली’; ठाकरे गटाच्या नेत्याची कोणावर टीका
तर अनेकांच्या चौकशी होत आहे. तर अनेकांच्यावर छापेमारी झाली आहे. यावरून ठाकरे गटाकडून सतत भाजपवर टीका होताना दिसते. आता देखील ठाकरे गटाचे नेते आमदार सुनील राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | राज्यातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ED कडून नोटीस गेल्या आहेत. तर अनेकांच्या चौकशी होत आहे. तर अनेकांच्यावर छापेमारी झाली आहे. यावरून ठाकरे गटाकडून सतत भाजपवर टीका होताना दिसते. आता देखील ठाकरे गटाचे नेते आमदार सुनील राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर जे राज्यात भाजप विरोधात बोलतात त्यांच्याविरोधात ED, CD ची कारवाई होते. पण आता आम्ही त्यांना घाबरत नाही असं इशारा राऊत यांनी दिला आहे. तर राज्यात आजपर्यंत ED, CD ही फक्त मराठी माणसालाच लागली आहे. बाकी कोणाला लागली आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भ्रष्टाचारी लोकच आवडतात अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.
Published on: Aug 07, 2023 10:30 AM