‘एनडीएतील पक्षांनी त्यांचा सत्कारच केला पाहिजे’; राऊत यांची मोदी, शाह आणि नड्डावर खरपूस टीका
आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन एनडीए आणि विरोधी पक्षांनी आपल्या आपल्या मित्र पक्षांच्या बैठका घेतल्या आहेत.
मुंबई, 19 जुलै 2023 | गेल्या दोन दिवसापासून राज्यासह केंद्रातील राजकीय तापमान चांगलेच तापलेलं आहे. आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन एनडीए आणि विरोधी पक्षांनी आपल्या आपल्या मित्र पक्षांच्या बैठका घेतल्या आहेत. एनडीएची नवी दिल्लीत तर विरोधी पक्षांची बंगळुरूमध्ये बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली होती. त्या टीकेला आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी राऊत म्हणाले, “ जेव्हा देशासाठी 26 विरोधी पक्षांची बैठक झाली तेंव्हा मोदींना एनडीएची आठवण झाली. मात्र त्यांना गेल्या 9 वर्षात एनडीए आठवली नाही. त्यांना मित्रपक्ष, आपले सहकारी आठवले नाही. आम्ही पाटण्याला, बंगळुरूला एकत्र आलो, त्यानंतर मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएतील पक्षांनी त्यांचा सत्कारच केला पाहिजे. त्यांना भीती आहे. आमच्या आघाडीची आमच्या इंडियाची”