त्यांना चाकणकरांच पद हवं असेल; सुषमा अंधारे यांची चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका

| Updated on: Jan 10, 2023 | 8:25 PM

महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे, आयोगाला केराची टोपली दाखवली जाते. पण बिनकामी बाईला तुम्ही खडसावलं का नाही? असा प्रश्न विचारत अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तिन महिला या एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद चांगलाच पेटला आहे. तर उर्फीवरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला आणि अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना निशाना केला आहे. त्यातच या वादावर सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नाहीत. ते गृहमंत्री म्हणुन कुचकामी ठरत आहेत. माझ्या सभा रद्द केल्या जात असून तेथेच भाजपच्या सभा होतात. हा दुटप्पीपणा नाही का, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. तुम्ही महिला आयोगाचा देखील अपमान करता.

वास्तविक महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे, आयोगाला केराची टोपली दाखवली जाते. पण बिनकामी बाईला तुम्ही खडसावलं का नाही? असा प्रश्न विचारत अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला.

अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना, चित्रा वाघ यांना महिला आयोगाच अध्यक्ष व्हावं असं वाटतं असावं. त्यामुळेच सध्या चित्रा वाघ या उर्फी जावेदवर बोलत आहे. हा वाद कसा चिघळेल हे पाहत आहेत.

Published on: Jan 10, 2023 08:25 PM
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाचीच : जेठमलानी
चित्रा वाघ यांची सध्याची स्थिती…कहीं पे निगाहें कहीं पे… सारखी : सुषमा अंधारे