मनीषा कायंदे यांच्यावर अंधारे यांचा निशाना; ‘त्यांनीच पक्ष सोडला आता…’

| Updated on: Jun 21, 2023 | 9:56 AM

सध्या अनेक गोष्टींची चर्चा आणि तर्क वितर्क लावले जात आहे. तर त्यांचे आता सदस्यत्व रद्द होईल असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मनीषा कायंदे यांच्यावर निशाना साधला आहे.

मुंबई : ठाकरे गटाच्या फायरबाँड प्रवक्त्या विधान परिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरून सध्या अनेक गोष्टींची चर्चा आणि तर्क वितर्क लावले जात आहे. तर त्यांचे आता सदस्यत्व रद्द होईल असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मनीषा कायंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच त्यांनी कायंदे यांचे सदस्यत्व रद्द होईल असं म्हटलं आहे. त्यांनी याबाबत पक्षविरोधी कारवाई कायद्यानुसार जर एखाद्या सदस्याने स्वत: पक्ष सोडला असेल आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असेल तर कारवाई ही होते. पण जर हकालपट्टी केली असेल तर होत नाही. तर कायंदे यांची त्यांच्या प्रवेशानंतरच हकापट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याने कारवाई होऊ शकते. त्याचं सदस्यत्व रद्द होईल असेही त्या म्हणाल्या. तर मध्यंतरीच एका पत्रावरून आमच्यात बोलणं झालं तेव्हांच त्यांना मी कर नाही तर डर कशाला असे म्हणाले होते. तर मी खीर खाल्ली नाही तर बूड घागरी ही होणार नाही. पण आता त्यांनी खीर खाल्ली. त्यामुळे बूड घागरी ही होणारच असं त्या म्हणाल्या.

Published on: Jun 21, 2023 09:56 AM
अंगावर खाकी वर्दी मनात विठ्ठलाचा गजर; पोलिस धावले बेलवाडीच्या रिंगणात
Special Report | एकनाथ शिंदे यांचा बंडाला 1 वर्ष पूर्ण; नितीन देशमुख यांचे गौप्यस्फोट; सुरतमध्ये नेमकं काय घडलं?