‘कचरा इकडचा तिकडे…’ भाजप नेत्याचं राऊत यांच्यावर टीका; म्हणाला, ‘ते कचऱ्या सारखे वागतात’
तर त्यांच्याबरोबर मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावनरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वरळीतील शिवसेना शिबीरातच यावरून टीका केली होती.
अकोला : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळपासून त्यांचा फोन नॉट रिचेबलही झाला आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्याबरोबर मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावनरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वरळीतील शिवसेना शिबीरातच यावरून टीका केली होती. त्यांनी त्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना, कोण जाणार त्यांचं नाव माहीत नाही. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका उलटला तर परत आमच्या दारात येतो. ते फार महान लोक नाहीत. सोडून द्या त्यांना, असं राऊत म्हणाले. त्यावरून कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यावरूनच भाजप नेते प्रविण दरेकर यांनी राऊत यांनी सुनावताना टीका केली आहे. त्यांनी, आपल्यात असलं की सोने. तर दुसऱ्यात गेलं की कचरा. संजय राऊत कचऱ्या सारखे वागतात, बोलतात म्हणून त्याना सगळं कचरा वाटतोय असं म्हटलं आहे.