‘जलसंघर्ष’ पेटणार? देशमुख यांचा सरकारला अल्टिमेट; म्हणाले, आम्ही काही दारू…
नागपूरमध्ये ‘जलसंघर्ष’ यात्रा पोहचण्याच्या आधीच देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ही यात्रा काढण्यापूर्वी देशमुख यांनी परवानगी घेतली नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे
नागपूर : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली. मात्र नागपूरमध्ये ‘जलसंघर्ष’ यात्रा पोहचण्याच्या आधीच देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ही यात्रा काढण्यापूर्वी देशमुख यांनी परवानगी घेतली नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेट देत हा प्रश्न सोडवा अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला आहे. तर पोलिसांना परमिशन नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही काही दारू नेत नव्हतो. जे पाणी आम्ही पितो, पोलिसांनी आम्हाला प्यायला दिलं तेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी नेत होतो. याच काय चुकीचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.