चौकशीचा फेरा वाढला; काल आठ तास, आजही होणार ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची चौकशी

| Updated on: Apr 19, 2023 | 9:28 AM

मालमत्तेच्या संदर्भात साळवी कुटुंबीयांवर प्रश्नांचा भडीमार एसीबीकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर आज देखील त्यांची चौकशी होणार आहे.

अलिबाग (रायगड) : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांचीही अडचणी वाढल्याच्या दिसून येत आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस गेली असून काल साळवी यांची अलिबाग येथे कसून चौकशी झाली आहे. ते गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर होते. आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आठ तास चौकशी काल करण्यात आली असून एसीबी कार्यालयात चौकशी पार पडली. यावेळी मालमत्तेच्या संदर्भात साळवी कुटुंबीयांवर प्रश्नांचा भडीमार एसीबीकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर आज देखील त्यांची चौकशी होणार आहे. आज साळवी कुटुंबीयांचा चौकशीचा हा सलग दुसरा दिवस असेल. राजन साळवी यांच्या पत्नी, दोन मुलं आणि मोठा भाऊ एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

Published on: Apr 19, 2023 09:27 AM
दि सिनेवंडर मॉल आणि बिझनेस पार्कजवळ भीषण आग; कारवाईचे संकेत
मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा; ‘या’ संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र