समान निधीवरून गदारोळ सुरूच; ठाकरे गटाचा नेताचा मोठा दावा; म्हणाला, ‘अजित पवार यांनीच म्हटलयं हो…’

| Updated on: Jul 25, 2023 | 1:49 PM

अजित पवार यांनी अर्थमंत्रालयाच्या चाव्या आपल्या हातात घेताच शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना भरभरून दिलं आहे. तर नाराज असणाऱ्या भरत गोगावले यांना खूश करण्यासाठी 150 कोटींचा निधी दिला. मात्र शरद पवार गट, ठाकरे गटाला निधीचं वाटपच केलेलं नाही.

मुंबई, 25 जुलै 2023 | राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सध्या निधी वाटपावरून विरोधकांच्या रडारवर सत्ताधारी आले आहेत. अजित पवार यांनी अर्थमंत्रालयाच्या चाव्या आपल्या हातात घेताच शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना भरभरून दिलं आहे. तर नाराज असणाऱ्या भरत गोगावले यांना खूश करण्यासाठी 150 कोटींचा निधी दिला. मात्र शरद पवार गट, ठाकरे गटाला निधीचं वाटपच केलेलं नाही. त्यावरून आता टीका होत आहे. यावरून अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना, त्यांनी असा कोणताही भेदभाव झालेला नाही. पण समान निधी वाटत झालेलं नाही. यात काही कमी जास्त प्रमाणात वाटप झाल्याचं म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी समान निधी वाटप झालेलाच नाही हे सिद्ध होत असल्याचं म्हणत त्याबाबत अजित पवार यांनीच परिषदेत म्हटल्याचं म्हटलं आहे. तसेच तर विरोधकांना एकही रूपया मिळालेलं नाही. हे दुर्दैवी आहे. समान निधी हा आमच्यासाठी नाही तर आम्हाला मतदान करणाऱ्या मतदारांसाठी असतो. त्याचे दायित्व हे सरकारचे असते. त्यामुळे एकाला आणि एकाला एक असा न्याय हे सरकार देतं असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे.

Published on: Jul 25, 2023 01:49 PM
“अहंकारापोटी पक्ष फुटीची काहाणी ऐकण्यासाठी…”, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजप नेत्याची टीका
‘या खेकड्यांना जपलं असतं तर सेना फुटली नसती…’; गूलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार