उदय सामंत यांच्या चॅलेंजला ठाकरे गटाचा खरमरीत प्रत्युत्तर; ‘अजित दादांना गद्दार….’
ठाकरे गटाकडून शिंदे गटाला मविआचे सरकार गेल्यानंतर गद्दार आसा उल्लेख करणं सुरूच होतं. मात्र आता अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने शिंदे गटाला गद्दार म्हणणं बंद झालं आहे.
मुंबई | 24 जुलै 2023 : अजित पवार यांच्यावर खापर फोडत शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला होता. त्यानंतर आता अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे गट आणि भाजपच्या युती सरकारमध्ये गेले आहेत. ते आता पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. तर ठाकरे गटाकडून शिंदे गटाला मविआचे सरकार गेल्यानंतर गद्दार आसा उल्लेख करणं सुरूच होतं. मात्र आता अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने शिंदे गटाला गद्दार म्हणणं बंद झालं आहे. त्यावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला उस्कवत हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार बोलून दाखवा असे चॅलेंज केलं आहे. तर अजितदादांचं आभारच मानतो, कारण ते आल्यापासून गद्दार बोलणं बंद झाल्याचंही त्यांनी म्हटसलं होतं. त्यावरून ठाकरे गटाकडून आता खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यावरून आमदार सचिन अहिर यांनी सामंत यांच्यावर निशाना साधताना, आमच्या पक्षात गद्दारी झाल्याने तो विषय आला आणि तोही कार्यकर्त्यांकडून आला. पण आता अजित दादांना गद्दार बोलायचं की नाही हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विषय असल्याचं अहिर यांनी म्हटलं आहे.