‘या’ मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा देणार? काय म्हणाले हे आमदार?
राज्य सरकार कुणबी मराठा प्रमाणपत्र सरसकट सर्व मराठा समाजाला देणार का? कोणतीही कागदपत्रे न घेता सरकार 100 टक्के मराठ्यांना प्रमाणपत्र देणार का? मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे
धाराशिव : 4 सप्टेंबर 2023 | जालना येथे झालेल्या पोलिसांच्या लाठीह्ल्ल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराने मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा देऊ असे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विविध घोषणा केल्या. त्यावरून राज्य सरकार कुणबी मराठा प्रमाणपत्र सरसकट सर्व मराठा समाजाला देणार का असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कोणतीही कागदपत्रे न घेता सरकार 100 टक्के मराठ्यांना प्रमाणपत्र देणार का? मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकार वेळकाढूपणाची भुमिका घेत आहे, कुणबी प्रमाणपत्र ही तात्पुरती मलमपट्टी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावले तर उद्धव ठाकरे गट सरकारला पाठिंबा देईल असे आमदार कैलास पाटील म्हणाले.