‘एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झालाय…तुमच्या बुद्धीची…,’ काय म्हणाले ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील कुटुंबातील वाद जगजाहीर आहे.ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी उध्दव ठाकरे यांनी मतदारसंघात सहा जाहीर सभा घेतल्या. उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती.
धाराशीव लोकसभा मतदार संघात ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा जवळपास साडे तीन लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आणि त्याचे पती भाजपा आमदार राणाजगजित सिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टिका केली होती. त्यावर ओमराजे निंबाळकर म्हणाले की जर एक दीड हजारांनी पराभव झाला तर मॅनिप्युलेट केलंय असं म्हणू शकला असता. परंतू तुमचा पराभव इतक्यांचा पैशांचा वाटप केले असतानाही झाला. महिला बचत गटाच्या प्रत्येक सदस्याला एक-एक हजार रुपये वाटण्यात आले होते. सगळीकडे कॅश सापडत होत्या. तरी तुम्ही पराभव मान्य करीत नाही म्हणजे तुमच्या बुद्धीची किव करु सारी वाटते असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे आमदार राणाजगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या अजित गटातून महायुतीच्यावतीने उभ्या होत्या. उस्मानाबाद ( धाराशिव ) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे. ओम राजेनिंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली आहेत.