…तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे कपडे काय ठेवणार नाही; भाजप नेत्याचा राऊत यांना इशारा

| Updated on: Apr 27, 2023 | 12:08 PM

राऊत यांच्यावर पलटवार करताना आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी राऊत हे खोटा नोटा आरोप करतात. खालची पातळीवर जात अपशब्द वापरतात, त्यामुळे त्यांनी हा इशारा समजावा असे म्हटलं आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आज टीका केली. त्यांनी अमित शाह यांच्यावर दंगलीवरून निशाना करत टीका केली. यानंतर आता राऊत यांच्यावर पलटवार करताना आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी राऊत हे खोटा नोटा आरोप करतात. खालची पातळीवर जात अपशब्द वापरतात, त्यामुळे त्यांनी हा इशारा समजावा असे म्हटलं आहे. तर यापुढे भारतीय जनता पक्षाच्या कुठलाही नेत्यावर तुम्ही खोटा आरोप केलात, अपशब्द वापरलात तर आम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहोत. बाळासाहेब यांचे ओरिजिनल शिवसैनिक म्हणून आम्ही मोठे झालेले आहोत. राऊत सारखा चायनीज मॉडेल आम्ही नाही. हल्ली आलेल्या राऊत यांनी शिवसेनेबद्दल बोलणं, शिवसेनेबद्दल, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरें बद्दल बोलणं, ही त्याच्या लायकी नाहीये. त्यामुळे यापुढे बोलताना त्यांनी विचार करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलावं. त्यामुळे बोलण्याआधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची किती इज्जत ठेवायची असेल. त्यांचे कपडे वाचवायचे असतील तर बोलू नये. अन्यथा मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे कपडे काय ठेवणार नाही असा इशारा दिला आहे.

Published on: Apr 27, 2023 12:08 PM
मुख्यमंत्री बदलांच्या चर्चेतच भाजपचा मोठा नेता शिंदेच्या बंगल्यावर, चर्चेला उधाण; काय आहे कारण?
काल संजय राऊतांनी पुतळ्याला हार घातला, आज कारखान्याच्या कामगारांनी शुद्धीकरण केलं