आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा; संजय राऊत यांचा फडणवीस यांना टोला, म्हणाले…

| Updated on: Apr 21, 2023 | 11:31 AM

यावेळी राऊत यांनी, अभंगाला उत्तर द्या, तुम्ही फक्त बेईमानांच्या चिपळ्यात वाजवताय असा घणाघात फडणवीस यांच्यावर केला आहे. तर आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा आमचा अभंग

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार टीका होताना दितसे. तर त्याला प्रत्यत्तर देखील दिलेलं पहायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी, राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद करायला हवा, असा टोला राऊत यांनी लगावला होता. त्याला आज राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी राऊत यांनी, अभंगाला उत्तर द्या, तुम्ही फक्त बेईमानांच्या चिपळ्यात वाजवताय असा घणाघात फडणवीस यांच्यावर केला आहे. तर आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा आमचा अभंग. पण तुम्ही कीर्तन करताय का? नाही. तुम्ही जे करताय ते थोतांड आहे. अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका. अभंग हे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. ताकद असेल तर अभंगाला उत्तर द्या. तुम्ही फक्त चिपळ्यात वाजवताय असे राऊत यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 21, 2023 11:31 AM
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर राऊत यांचे जोरदार टीकास्र
महिलांचं अनोखं ‘बाजा बजाओ आंदोलन’, कुठं एकवटले ग्रामस्थ?