माजी गृहमंत्री यांनी राऊतांसह राणे फडणवीसांना का केली टीका? म्हणाले, ‘त्यांच्या बोलल्याणे…’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी दिवसाची सुरुवात करताना सकाळी टिव्ही लावला की एका बाजुने संजय राऊत तर दुसऱ्या बाजुला नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांची अब्रूच काढताना दिसतात असं खडेबोल सुनावलेत आहेत.
पुणे : रोज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार नितेश राणे यांचे टिव्हीवर आरोप-प्रत्यारोप पहायला मिळतात. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी दिवसाची सुरुवात करताना सकाळी टिव्ही लावला की एका बाजुने संजय राऊत तर दुसऱ्या बाजुला नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांची अब्रूच काढताना दिसतात असं खडेबोल सुनावलेत आहेत. तसेच हे तिघे रोज सकाळी एकमेकांची अब्रू काढणारं बोलत असतात. त्यांना एकमेकांच्या आब्रु काढण्यापलीकडे काहीच करता येत नाही. यातून सामान्य जनतेचे कल्याण काय होणार असा खडा सवालच त्यांनी भर सभेत मांडला. त्याला सभेतुनही दाद मिळालीय. वळसेपाटील हे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील दौऱ्यावर असताना बोलत होते.
Published on: Jun 13, 2023 11:49 AM