अजित पवार यांनी राऊत यांना पुन्हा फटकारलं; म्हणाले, ”तारतम्य”, आता कारण काय?

| Updated on: Jun 03, 2023 | 10:14 AM

राऊतांनी सारवासारव केली आहे. तर थुंकण्यावर बंदी आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी यावेळी केला. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना संजय राऊत यांनी आधी थुंकलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता सर्वस्तरातून टीका होत आहे. यावरून राऊतांनी सारवासारव केली आहे. तर थुंकण्यावर बंदी आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी यावेळी केला. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे. त्याचं पालन सगळ्या नेत्यांनी करायला पाहिजे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो. ते उभ्या देशाला दाखवून दिलंय. त्यामुळे प्रत्येकानं तारतम्य ठेऊन वागावं असा सल्ला त्यांनी राजकीय नेत्यांसह राऊत यांना दिला आहे. तर राऊत यांनी त्यावर काय खुलासा केला हे ही त्यांनी सांगितलं. त्यांनी, मला दुसरी बाजू एकायला मिळाली त्यात संजय राऊत यांनी म्हटलं की, काही त्रास होता त्यामुळे त्यांनी ते केल. माझा थुकण्याचा उद्देश नव्हता.

Published on: Jun 03, 2023 10:14 AM
नांदेडच्या रँचोची कमाल! चक्क दुचाकीच्या साहाय्याने बनवली लिफ्ट
भाजप नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अनिल देशमुख यांनी थेट म्हटलं…