“मणिपूरच्या महिला अत्याचारावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला, मात्र आपल्या राष्ट्रपती महिला असून गप्प”
त्याचदरम्यान आता कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात असून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
मुंबई | 22 जुलै 2023 : मणिपूरमध्ये जवळपास तीन महिन्यांपासून हिंसाचार उसळला असून त्याबाबत अजूनही केंद्र सरकारकडून कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्याचदरम्यान आता कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात असून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरधील घटनेवरून केंद्रातील भाजपवर निशाना साधला आहे. तर राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील खडेबोल सुनावले आहेत. यावेळी राऊत यांनी, संपूर्ण देश आणि विश्वासमोर ‘मणिपूर फाईल्स’ ओपन झाल्या असून लोकांमध्ये संतापाची लाट आहे. मणिपूरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ले होत असून मणिपूरची अवस्था ही काश्मीरपेक्षा भयंकर आहे. मात्र तिथलं सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यावर मूकदर्शक बनलं आहे. मणिपूरमध्ये घडलेला महिला अत्याचारात जर कोणी अल्पसंख्यांक असता तर भाजपनं देशात राण उठवलं असतं. मात्र त्यांना तिथे काश्मीरसारखं राजकारण करता येत नाही. त्यांना फायदा होत नाही म्हणून भाजपावाले चूपचाप शांत बसलेत. त्यातही आपल्या राष्ट्रपती एक महिला असून देखील ही त्यांनी त्यावर बोललेल नाही. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांनी आदेश काढले. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारला आदेशही दिले नाहीत, असंही ते म्हणालेत.