दादा भुसे यांच्या अजब सल्ल्यावर संजय राऊत भडकले? म्हणाले, “दीडशहाणे मंत्री…”
केंद्र सरकारकडून कांदा निर्यात धोरणात मोठा निर्णय घेण्यात आला. तर कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने सुरू केली आहेत.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | राज्यात कांद्यावरून सध्या कांदा उत्पादक शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. तर केंद्र सरकारच्या कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढीविरोधात शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. मात्र याचदरम्यान मंत्री दादा भुसे यांनी धक्कादायक विधान केंल आहे. ज्यामुळे दादा भुसे यांच्यावर टीका होत आहे. दादा भुसे यांनी कांदा खाणं परवडत नसेल तर कांदा दोन-तीन महिने खाऊ नका, असं म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, परवडत नसेल तर कांदा खाऊ नका असं म्हणणं मस्तवालपणा असल्याची टीका राऊत भुसे यांच्यावर केलेली आहे. तर हा मंत्र्यांचा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झालाय अशी टीका देखील त्यांनी केली आहे. कांद्यामुळे केंद्रातली भाजपची सत्ता गेलेली तीच वेळ आता राज्यात आली आहे असं देखील त्यांनी म्हटलंय.
Published on: Aug 22, 2023 11:34 AM