नितेश राणे यांच्या टीकेला सुषमा अंधारे याचं दोनच वाक्यात उत्तर, म्हणाल्या; ”लहान पोरांवर”
भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी शिवसेनेची काय लायकी आहे बेळगावात असा सवाल केला होता? तर खानापूर मतदारसंघात दिलेल्या उमेदवार पाटील यांना फक्त 979 मतं पडली.
नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक निवडणूक झालेल्या पराभवावर टीका केली होती. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी शिवसेनेची काय लायकी आहे बेळगावात असा सवाल केला होता? तर खानापूर मतदारसंघात दिलेल्या उमेदवार पाटील यांना फक्त 979 मतं पडली. त्यातही त्या मतदारसंघात नोटाला अधिक मतं पडली अशी टीका केली. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावर पटलवार करताना टीका केली. यावेळी त्यांनी, लहान पोरांवर आम्ही उत्तर देत नाही, आणि त्यांना गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला आहे.
Published on: May 14, 2023 02:20 PM