त्यांना शरिया कायदा हवा; म्हणूनच संविधानानं बोंब मारत आहेत; भाजप नेत्याची राऊत यांच्यावर सडकून टीका
Image Credit source: tv9

त्यांना शरिया कायदा हवा; म्हणूनच संविधानानं बोंब मारत आहेत; भाजप नेत्याची राऊत यांच्यावर सडकून टीका

| Updated on: May 01, 2023 | 1:28 PM

महाराष्ट्र आज अस्थिर दिसतो आहे त्याला पूर्णपणे जबाबदार संविधानाची पायमल्ली करणारे राज्य चालवत आहेत. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठीच ही वज्रमूठ सभा आयोजित केल्याचे ते म्हणाले होते.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात करताना महाराष्ट्रातच संविधानाची (Constitution) सर्वाधिक पायमल्ली सुरु असल्याचं म्हटलं होतं. तर कायद्याचं राज्य मोडून काढलं जातं आहे. देशभरात ज्या अनेक गोष्टी घटनेच्या आधाराने निर्माण केल्या त्याची पायमल्ली केली जाते आहे. महाराष्ट्र आज अस्थिर दिसतो आहे त्याला पूर्णपणे जबाबदार संविधानाची पायमल्ली करणारे राज्य चालवत आहेत. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठीच ही वज्रमूठ सभा आयोजित केल्याचे ते म्हणाले होते. त्यावर भाजप नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी, महाविकास आघाडी ही बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानतच नाही. हे आम्हाला त्यांच्या अडीच वर्षाच्या कारभारामध्येच कळालं होतं. ते शरिया कायदा मानणारे आहेत. पाकिस्तान आणि जिहादी देशांमध्ये जो शरिया कायदा आहे तो यांना लागतो. त्यांच्या कारकीर्दीमध्ये यांनी जर संविधान पाळलं असतं तर आमच्या राज्यामध्ये अत्याचार झाला नसता. कोरोनाच्या नावाने हिंदूंच्या देव देवतांवर आणि सणांवर रोक लागले नसते. हिंदूंवर अत्याचार झाले नसते. त्यामुळे तुम्ही संविधानाला मानतच नाही. तुम्हाला तोच कायदा पाहिजे आहे, म्हणूनच तुम्हाला संविधानाच्या नावाने बोंब मारायची आहे असा घणाघात केला आहे.

Published on: May 01, 2023 01:28 PM
देशाला अशा इव्हेंटची गरज नाही, भाजपला असेल?; ठाकरे गटाच्या नेत्याची टीका!
विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळे मंत्री झाले, कुणी केला मोठा दावा?