राऊत यांच्यावर बार्शीत गुन्हा दाखल, काय केलं ट्विट? काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 20, 2023 | 11:12 AM

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाना साधत केलं आहे. तर या ट्विटमध्ये एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे

बार्शी (सोलापूर) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आता एका ट्विटमुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. हे ट्विट त्यांनीच केलं आहे. ज्यातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाना साधत केलं आहे. तर या ट्विटमध्ये एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे. त्यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटरवर तो फोटो शेअर करत, “देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.” या ट्वीटनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका केली.

Published on: Mar 20, 2023 11:10 AM
‘… आता शिंदे तरी कदमांना जवळ ठेवतील का?’ अंधारे यांचा कदमांवर निशाना
मागणी करण्याआधी चेहरा आरशात पहावा; बावनकुळेंची मविआवर टीका