पाठीमागे फक्त सरदार पटेलांचे फोटो लावून चालत नाही; राऊत, अमित शाहांवर गरजले
राऊत यांनी शाह यांच्यावर टीका करताना, देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी ठरवयाला हवं की काश्मीरात जावं की अरूणाचल प्रदेशला.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. अमित शाह हे मुंबई दौऱ्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावरून राऊत यांनी शाह यांच्यावर टीका करताना, देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी ठरवयाला हवं की काश्मीरात जावं की अरूणाचल प्रदेशला. पण त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम दिसतंय. राज्यातील सरकार अस्थिर आहे. सोंगटे आणि गोटे हलवायचे असतील म्हणून येत असतील महाराष्ट्रात अशी टीका केली आहे. तर शाह हे गृहमंत्री कमी आणि भाजप नेते जास्त वाटतात. या देशाला उत्तम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्रालाही निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. पाठीमागे सरदार पटेल फोटो लावून चालत नाही असा टोला राऊतांनी शाह यांना लगावला आहे.
Published on: Apr 26, 2023 12:34 PM