राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल; ‘ते आवाहन’ पडलं महागात?
पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण शांत होतं न होतं तोच आता त्यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण शांत होतं न होतं तोच आता त्यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच सर्वोच्च न्यायलयाने काय म्हटलं हे सांगताना, राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये असे आवाहन केले होते. त्यावरून आता त्यांच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. त्यांच्या या आवाहनाविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.