VIDEO : मोठं भगदाड? ठाकरे गटाची धाकधूक वाढली, मनीषा कायंदे नॉट रिचेबल
उद्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटासह शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याच्याआधी दोन्दी गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता सत्तेत येऊन एक वर्ष होणार आहे. तर उद्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटासह शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याच्याआधी दोन्दी गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाला शिशिर शिंदेंनी यांना धक्का देत ठाकरे गटाच्या गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठं भगदाड पडणार आहे. तर आता एक आमदार आणि तीन माजी नगरसेवक ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका दिवसाआधीच असे झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे याच शिंदे गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. याचदरम्यान आता त्या नॉच रिचेबल झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. तर कायंदे या शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशीच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.