शिवसेना ही कोणाची हे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही, उद्ध ठाकरे यांची टीका
उद्धव ठाकरे यांनी, या सभेतील हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल.
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोरा येथे सभा झाली. यावेळी सभेत ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला बोल केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना देण्याच्या निर्णय देणाऱ्या निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरत टीका केली. उद्धव ठाकरे यांनी, या सभेतील हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोग आहे. त्याला हे दिसत नाही. त्यात त्यांचा दोष नाही. आयोग धृतराष्ट्र झाला आहे. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल, अशी टीका केली आहे.
Published on: Apr 24, 2023 07:41 AM