ठाकरे गटाचा नाशिकमध्ये इशारा मोर्चा, संजय राऊत म्हणाले तुमची लक्तरे…

| Updated on: Oct 19, 2023 | 9:39 PM

नाना पटोले, आमदार रवीद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी काही वेगळी माहिती दिलेली नाही. नाशिकचेच मंत्री ललित पाटील याच्या मागे आहेत असे त्यांनी सांगितलेले आहे. सुषमा अंधारे यांनी तो स्फोट केला. त्यामुळे तुमची लक्तरे निघाली आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

नाशिक | 19 ऑक्टोंबर 2023 : नाशिकमध्ये ड्रग्ज बाजार खुलेपणाने होत आहे. राज्यातील दोन मंत्र्यांवर आरोप होत आहेत. शाळा – काँलेजची मुले ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहेत. मात्र, यात पोलिसांचा व्यवहार आणि व्यापारात सहभागी असल्याचे पहायला मिळतंय. यामध्ये नाशिकच्या पालकमंत्र्यांचं नाव पुढे येत आहे. महाराष्ट्राला नायझेरिया करायचं आहे. केनिया करायचे आहे. उडता पंजाब करायचे आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. नाशिकमध्ये शिवसेना इशारा मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सरकारला धडकी भरविणारा असेल असे राऊत म्हणाले. यातूनही सरकारने काही धडा घेतला नाही तर शिवसेनेला रस्त्यावरून उतरून पुढची कठोर पावलं टाकावी लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

Published on: Oct 19, 2023 09:39 PM
वसंत मोरे यांच्या बारामती लोकसभा उमेदवारीवर राज ठाकरे याचं शिक्कामोर्तब? म्हणाले…
रोहित पवार यांना नोटीस, कोर्टाने दिला दिलासा, नोटीसच रद्द केली