लग्न समारंभात शिवसेनाचा ‘हा आमदार दिसताच’ एकच घोषणा; ’50 खोके एकदम ओके’चा दणदणाट, कोण हा नेता?
इतकेच काय तर त्यांच्या विरोधात '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या जातात. मध्यंतरी हा सुर कमी झाला होता. मात्र आता एका लग्न समारंभात शिंदे गटाच्या आमदाराविरोधात या घोषणा दिल्याने तेथील वातावरण तंग झालं होतं. तर समारंभात गोंधळ निर्माण झाला होता.
परभणी : उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना उदयास आली. तेंव्हा पासून शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांवर ठाकरे गटाकडून टीका होत असते. इतकेच काय तर त्यांच्या विरोधात ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या जातात. मध्यंतरी हा सुर कमी झाला होता. मात्र आता एका लग्न समारंभात शिंदे गटाच्या आमदाराविरोधात या घोषणा दिल्याने तेथील वातावरण तंग झालं होतं. तर समारंभात गोंधळ निर्माण झाला होता. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. लग्न मंडपात बांगर यांचे आगमन होताच. तेथे पहिल्यापासून उपस्थित असलेले ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचे बांगर यांनी चरण स्पर्श केले. मात्र तेथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून `पन्नास खोके एकदम ओके, च्या घोषणा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र एकूणच घडलेल्या प्रकारानंतर खोक्याचे लोन आता लग्नसराईपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.