उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना इशारा; म्हणाले, ‘तुम्हाला शवासन…’
यावेळी ठाकरे यांनी देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे असा इशारा देताना, तुमचे व्हॉट्स अॅप देखील बाहेर आलेले आहेत. आम्ही त्याच्यावर अजून बोललेलो नाही. पण जर बोलायला लागलो तर तुम्हाला शवासन करावं लागेल.
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलवलेल्या विरोधकांच्या बैठकीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह शिंदे गटाकडून टीका करण्यात आली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हे लोक परिवार बचाव बैठकीला गेलेत असं म्हणत टीका केली होती. त्यावरून ठाकरेंनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांना टोला लगावला आहे. यावेळी ठाकरे यांनी देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे असा इशारा देताना, तुमचे व्हॉट्स अॅप देखील बाहेर आलेले आहेत. आम्ही त्याच्यावर अजून बोललेलो नाही. पण जर बोलायला लागलो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. माझ्या परिवाराबद्दल बोलू नका असा इशाराच त्यांनी फडणवीसांना दिलाय. त्यांनी हा इशारा दादरच्या शिवाजी मंदिरात आयोजीत शाखाप्रमुखांचा मेळाव्यात बोलताना दिला.
Published on: Jun 24, 2023 03:33 PM