शिरसाट आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर; चतुर्वेदी यांचा शिरसाट यांना पुन्हा टोला, कॅरॅक्ट लेस…

| Updated on: Jul 31, 2023 | 11:29 AM

शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर सौंदर्यावरून टीका करताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना फक्त सौदर्य पाहून तिकीट दिलं असं म्हटलं होतं. त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत उत्तर दिलं होतं. त्यांनी, मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे. हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला असा निशाना साधला होता.

नवी दिल्ली, 31 जुलै 2023 | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यात सध्या ट्विटर वॉर रंगल्याचे पहायला मिळत आहे. शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर सौंदर्यावरून टीका करताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना फक्त सौदर्य पाहून तिकीट दिलं असं म्हटलं होतं. त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत उत्तर दिलं होतं. त्यांनी, मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे. हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला असा निशाना साधला होता. त्यानंतर शिरसाट यांनी पलटवार करताना, आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत… मला बोलण्यापेक्षा त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं… असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यावर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी हल्लाबोल केला आहे. पाहा हा व्हिडिओ…

Published on: Jul 31, 2023 11:29 AM
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना; स्थानिक आमदार मनिषा चौधरी बोरिवली रेल्वे स्थानकात दाखल!
नेमकं काय घडलं जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये? जाणून घ्या या 12 मुद्द्यातून…