‘सध्याच सरकार हे गुन्हेगारांना पाठिशी घालणारं’; नोटिसीवरून राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
राऊत यांनी काही दिवसांपुर्वी सरकारवर टीका करताना, मुख्यमंत्री कार्यालयातून कारागृहांमधील गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप, त्यांनी केला होता.
मुंबई | 16 जुलै 2013 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. आता पुन्हा एकदा ते अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहेत. राऊत यांनी काही दिवसांपुर्वी सरकारवर टीका करताना, मुख्यमंत्री कार्यालयातून कारागृहांमधील गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप, त्यांनी केला होता. त्याविरोधात आता मुंबई क्राईम ब्रँचकडून पावले चलली गेली आहेत. तर त्याविरोधात राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे. यावरून राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे -फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल करताना टीका केली आहे. यावेळी त्यांनी, नक्कीच अशी कोणती नोटीस आलीच तर आपण पुराव्यानिशी त्यांना उत्तर देऊ असे म्हटलं आहे. तर ज्यांच्यावर चार्टशिट आहे, आरोप पत्र आहेत, जामिनावर सुटले आहेत, ज्यांच्यावर देश बुडवण्याचे आरोप झालेत ते सरकारमध्ये सामिल झाले नसते. हे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारं आहे, हे सगळ्यांना माहित असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.