पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या आधी ‘हे’ करावं; राऊत यांचा खोचक सल्ला

| Updated on: Jul 11, 2023 | 12:59 PM

यावेळी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार सोहळा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणार असून ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

मुंबई : 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावेळी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार सोहळा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणार असून ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदीं यांच्यासह टिळक ट्रस्टवर टीका केली आहे. तसेच भाजपसोबत गेलेल्या भ्रष्ट नेत्यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. आपण पंतप्रधान मोदी आणि ज्या समितीने हा पुरस्कार जाहिर केलाय त्यांना आपण लोकमान्य टिळत यांचे चरित्र भेट म्हणून पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या आधी लोकमान्य टिळत यांचे चरित्र वाचावे असेही म्हटलं आहे.

Published on: Jul 11, 2023 12:59 PM
मोठी बातमी! कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
“तू मर्दांनगीवर कलंक, तू किती मोठा मर्द आहेस, ते…”, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली