‘दो मस्ताने चले, चुना लगा के…’; संजय राऊत यांची कोणावर जोरदार हल्ला?

| Updated on: Jun 19, 2023 | 7:33 AM

यावेळी राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून लूट केली जात आहे, असं राऊतांनी टीकास्र सोडलं. तर यावेळी राऊत यांनी, आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईचा ‘रोडमॅप’च आपल्यासमोर ठेवला आहे. मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे त्यांनी सांगितलं.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चारोळी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी ही टीका वरळी येथील राज्यव्यापी शिबीरात केली. यावेळी राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून लूट केली जात आहे, असं राऊतांनी टीकास्र सोडलं. तर यावेळी राऊत यांनी, आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईचा ‘रोडमॅप’च आपल्यासमोर ठेवला आहे. मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे त्यांनी सांगितलं. होय, मुंबईची लूटच सुरू आहे. यासाठी दुसरा शब्द नाही. महाराष्ट्रात लूट… मुंबईत लूट… देशात लूट… या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने’. तर हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत.

Published on: Jun 19, 2023 07:33 AM
‘विश्वगुरु अमेरिकेत …पण मणिपूरमध्ये जायला वेळ नाही’; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात
“मस्ताने म्हणा किंवा दिवाने म्हणा, पण तुम्हाला वेड असू नये,” राऊत यांच्या टीकेवर कोणाची टोलेबाजी?