Shivsena UBT : मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व; ठाकरेंची शिवसेना आक्रमक

| Updated on: Mar 25, 2025 | 5:18 PM

Shivsena UBT Protest In Girgaon : गिरगाव येथील डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात केवळ मराठी असल्याने सभासदत्व नाकारण्यात आल्याने आज ठाकरेंच्या शिवसनेने असोसिएशनच्या कार्यालयाला काळं फासलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेने डायमंड असोसिएशनच्या कार्यालयाला काळं फासलं आहे. मराठी असल्याने असोसिएशनने सभासदत्व न दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत गिरगावमधील डायमंड असोसिएशनच्या कार्यालयाला आज काळं फासलं आहे. गिरगावमधील या कार्यालयात 17 हजार सभासदांपैकी केवळ 50 ते 60 सभासद हे मराठी आहे. सर्व नियमावली पूर्ण करून देखील केवळ मराठी असल्याने हे सभासदत्व न दिल्याचा आरोप आहे. तर काही सभासदांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना देखील ते मराठी असल्याने सभासदत्व नाकारलं आहे. हा सभासदत्व अर्ज देखील मराठीत नसल्याचा आरोप आहे.

Published on: Mar 25, 2025 05:18 PM
‘माझ्या बाळाला फक्त बोलता यावं…’, एकनाथ शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच माऊलीला अश्रू अनावर
‘…तसा अंगावर शाल घेऊन एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय’, परबांची राणेंवर नाव न घेता टीका; ठाकरेंही गालातल्या गालात हसले