दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत जाण्याआधीच उद्धव ठाकरे यांना पोलीसांनी रोखलं? नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 22, 2023 | 12:41 PM

इर्शाळवाडीत दरड कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

मुंबई | 22 जुलै 2023 : रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली असून इर्शाळवाडीत दरड कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर करत इर्शाळवाडितील नागरिकांचे कायमस्वरूपी पुर्नवसन केले जाईल असे म्हटलं आहे. तर याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. ते येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत. पंचायत मंदिरात बचावलेल्या ग्रामस्थांशी ते संवाद साधणार असून नंतर ते इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्त वाडीच्या पायथ्याला जाऊन मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतील. मात्र त्याच्याआधीच ठाकरे यांची व्हनिटी व्हॅन पोलिसांनी चौक गावात रोखली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर ठाकरे यांची व्हनिटी व्हॅन पोलिसांनी का रोखली यांची चर्चा सुरू आहे. तर ठाकरे यांची व्हनिटी व्हॅन सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडीच्या अडचणीमुळे ती चौक गावात थांबवल्याचे समोर आले आहे.

Published on: Jul 22, 2023 12:41 PM
“शिंदे सरकार सध्या हवेत, सरकारच्या फक्त दिल्लीवाऱ्या सुरु”, काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा खोळंबली; कल्याण स्थानकात झालं असं काय?