402 किलोमीटरचा प्रवास, 19 दिवसांची पायपीट; मुख्यमंत्र्यांना भेटत सोलापूरच्या समस्या सांगितल्या
CM Eknath Shinde : अर्जुन रामगिर हे सोलापूरचे रहिवासी असून सोलापूरचे विविध समस्या घेवून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले. अर्जुन रामगिर हे सोलापूरहून 19 दिवस पायी चालत मुंबईत दाखल झाले. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपल्या समस्या सांगण्यासाठी सोलापूरच्या अर्जुन रामगिर यांनी 19 दिवस पायी प्रवास केला. सोलापूरच्या विविध समस्या घेवून अर्जुन रामगिर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सोलापूरहून पायी चालत निघाले. 19 दिवसांनंतर काल ते मुंबई पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्जुन रामगिर यांनी ठाण्यात भेट घेतली. सोलापूरच्या विविध समस्या त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. आरोग्यव्यवस्था, पाणी, रोजगार, रस्ते अशा विविध मुद्दे त्यांनी शिंदे यांच्यासमोर मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या या समस्या सोडवण्यासाठी अर्जुन रामगिर यांना आश्वासन दिलं. “आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली. सोलापूरवासीयांचे प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले. त्यांनी त्या समस्या सोडवल्या जातील, असा शब्द दिला आहे”, असं अर्जुन रामगिर यांनी या भेटीनंतर सांगितलं.