Video : मुसळधार पावसाने शाळेत पाणी शिरलं! 170 विद्यार्थी शाळेतच अकडले, पालकांचा जीव टांगणीला
Thane Rain : अतिवृष्टी झाल्यामुळे ही मुलं शाळेत आतमध्ये अडकली गेली होती. अखेर अग्निशमन दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवान एका फायर वाहनासह शाळेत दाखल झाले आणि त्यांनी तातडीने या सर्व मुलांची सुखपूर सुटका केली.
ठाणे : गुरुवारी संध्याकाळी नवी मुंबई, ठाणे भागात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासर ढगांच्या गडगडाटात झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडवली. याच मुसळधार पावसामुळे दिवा येथील एका शाळेत (Heavy Rain) विद्यार्थी अडकले होते. तब्बल 170 मुलं शाळेत अडकून पडले होते. या सर्व विद्यार्थ्यांची (Students) अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. महापे-शिळफाटा मार्गावर मार्गावर असेलल्या रफीका हायस्कूल (Rafiqua High School) या शाळेत पावसाचं पाणी शिरलं होतं. त्यामुळे ही मुलं शाळेतील वर्गांतच अडकली. फाऊंटन हॉटेल जवळ मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे ही मुलं शाळेत आतमध्ये अडकली गेली होती. अखेर अग्निशमन दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवान एका फायर वाहनासह शाळेत दाखल झाले आणि त्यांनी तातडीने या सर्व मुलांची सुखपूर सुटका केली. विद्यार्थी शाळेत अडकल्यानं पालकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र अखेर सर्व विद्यार्थी सुखरूप आपआपल्या घरी आल्यानं पालकांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय.