Kedar Dighe On BMC Election | पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल – tv9
शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी घडलेली ही संघटना आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने करत होते आणि यापुढे देखील ते करत राहतील.
26 ऑगस्ट हा ठाणेकरांसह अख्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा अतिशय दुःखाचा दिवस असतो. या दिवशी लोक येथे आनंद दिघे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच आशीर्वाद घेण्याकरता येत असतात. तर ठाण्यातील जनता ही सुज्ञ आहे आणि ती साहेबांच्या विचारावर चालणारी शिवसैनिकांची असल्याचे केदार दिघे म्हणाले. तसेच यावेळी केदार दिघे म्हणाले की, ठाण्यात जरी दोन गट पडले असले तरिही शिवसेनेमध्ये राजकारण कोण करत आहे हे जनतेला माहित आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी घडलेली ही संघटना आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने करत होते आणि यापुढे देखील ते करत राहतील. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये फक्त शिवसेनेचा एकच नगरसेवक होता. पण येत्या महानगरपालिका निवडणूकमध्ये महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसेल, असा विश्वासही केदार दिघे यांनी यावेळी व्यक्त केला.