अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येण्याच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; पाहा…

| Updated on: Apr 13, 2023 | 10:23 AM

Jitendra Awhad : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

ठाणे : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे पुन्हा एकत्र येतील, असं म्हटलं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मोठ्या राजकारणापासून मी अलिप्त असतो. मी गल्लीबोलात राजकारण करत असतो. अंजली दमानिया, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळी मोठी माणसं आहेत. त्यांच्या मेंदूतून कधी काय निघेल सांगता येत नाही, तेवढा माझा मेंदू तेवढ्या उच्च प्रतीचा नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी राज मुंगसे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. खरी गोष्ट आहे, जर तुम्ही 50 खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो 50 खोके म्हटल्यावर? चोर चोर चोर ओरडलं की चोर कधीतरी मागे बघतो आणि पकडला जातो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 13, 2023 10:23 AM
शहाजीबापू पाटील यांचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; पाहा व्हीडिओ…
राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल; काय कारण? पाहा…