मागचे 9 महिने ठाण्यात दडपशाहीचे राजकारण चालूये; ठाकरे गटाच्या नेत्याचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
Kedar Dighe on CM Eknath Shinde : ठाकरेगटाचे नेते केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. केदार दिघे नेमकं काय म्हणालेत? पाहा....
ठाणे : ठाकरेगटाचे नेते केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. तर उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आपण असल्याचं सांगितलं आहे. “मागचे 9 महिने ठाण्यात दडपशाहीचे राजकारण चालू आहे. शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून सर्वत्र शाखा बांधल्या आहेत. पण यांची सर्वत्र दडपशाही सुरू आहे. पण या दडपशाहीला न मानता लोकमान्य नगरात पुन्हा नव्या जोमाने शाखा आम्ही सुरू केली आहे. ठाण्याचे शिवसैनिक हे वंदनीय बाळासाहेब, दिघेसाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत दडपशाही विरोधात आवाज उठवणार”, असं केदार दिघे म्हणाले आहेत.
Published on: Apr 10, 2023 08:16 AM