आमचे मुख्यमंत्री संवेदनशील, घराबाहेर पडतात, नाहीतर आधी…; उद्धव ठाकरेंना कुणाचा टोला?

| Updated on: Apr 10, 2023 | 9:33 AM

शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टोलाही लगावला आहे. पाहा व्हीडिओ

ठाणे : शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलंय. तसंच उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. अडीच वर्षे याआधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाहीत. पण आमचे मुख्यमंत्री घराबाहेर पडून सर्व आढावा घेत आहेत. आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. फक्त दोन दिवसांसाठी शिंदे अयोध्येत गेलेत.ते महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या दोन दिवसाने नेमकं असं काय वेगळं घडणार होतं? शरद पवार देशाची दिशाभूल करत आहेत, असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या आहेत. संजय राऊत यांनी काहीही सांगू नये. आतापर्यंत सर्व अयोध्येला जाण्याचं सर्व नियोजन ठाण्यातून केलं जायचं. एकनाथ शिंदे त्यावर विशेष लक्ष ठेवून असायचे. हे फक्त पाहुणे म्हणून तिकडे जायचे, असाही टोला मीनाक्षी शिंदे यांनी लगावला आहे.

Published on: Apr 10, 2023 09:33 AM
आशिष देशमुखांवर वडेट्टीवार बरसले; म्हणाले, त्यांचे वक्तव्य ही पान सुपारी घेऊन…
सावरकर हे शिंदेंचे दैवत; महाराष्ट्राचं दैवत जगदंबा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर : वडेट्टीवार