ठाकरेगटाच्या महामोर्चाला पोलिसांची परवानगी, पण ‘हे’ नियम पाळावेच लागणार

| Updated on: Apr 05, 2023 | 1:18 PM

Thane News : ठाकरेगटाच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा मोर्चा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून काढण्यात येतोय. तर या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला आहे. पाहा...

ठाणे : ठाण्यात आज ठाकरेगटाचा मोर्चा निघणार आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. त्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरेगटाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. बॅनर आणि पोस्टर नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसंच वेळेतच हा मोर्चा संपवावा, अशीही अट पोलिसांकडून ठेवण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता हा मोर्चा ठाण्यातील तलावपाळी इथल्या शिवाजी मैदानातून सुरू होईल. मग हा मोर्चा पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने जाईल.

Published on: Apr 05, 2023 01:18 PM
शिंदेंना, अयोध्येची वाट आम्ही दाखवली; राऊतांचा घणाघात, म्हणाले…
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बाळासाहेबांची जादू नाहीशी करायचीय; शिवसेनेच्या मंत्र्याचा आरोप