मुख्यमंत्र्यांनी असे म्हणणे बरोबर नाही…काय म्हणाले शरद पवार ?
समाजाला जागृत करायला लागेल, कुटुंबातील घटकांना जागृत करायला हवे. कायदा सुव्यवस्थेला जागृत करावे लागणार आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
बदलापूर सारख्या घटना समाजात वाढतच चालल्या आहेत. अशा घटनांमुळे समाज, कुटुंब घटक आणि कायदा सुव्यवस्था यांना जागृत करण्याची गरज असून त्यासाठी उद्याचा बंद पुकारल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. बदलापूर आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य करणे चुकीचे आहे. बदलापूरचे स्थानिक लोक कमी आणि राजकीय लोक जास्त आहेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे बोलणे चुकीचे आहे. आम्ही काय तिथे कोणी गेलेलो नव्हतो. कोणता राजकीय पक्ष तेथे होता असा सवाल पवार यांनी केला. काल त्यांनी असे बोलणं चुकीचा आहे. हा प्रश्न लोकांची संवेदना व्यक्त करण्याचा आणि अस्वस्था व्यक्त करण्याचा होता असेही पवार यांनी सांगितले.येथे कोणीही राजकारण आणलेले नाही.आमच्या कोणाच्या मनातही ते नाही.हा प्रश्न राजकीय नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.