चंदीगड विद्यापीठातलं शैक्षणिक वर्तुळ हादरलं, विद्यापीठातल्या स्कॅंडलचा सूत्रधार कोण?

| Updated on: Sep 18, 2022 | 10:59 PM

मुलींचं होस्टेल असताना हे व्हिडीओ कुणी व्हायरल केले,याचा तपास सुरू झाला. तेव्हा एका मुलीचंच नाव समोर आलं. तीनं हे व्हिडीओ का शूट केलेत, याचा तपास केला असता या प्रकरणाला नवं वळणं मिळालं.तिला अटकही झाले.

चंदीगड विद्यापीठातल्या होस्टेलमध्ये घडलेल्या प्रकारानं संपूर्ण देशातलं शैक्षणिक वर्तुळ हादरून गेलंय. येथील ६० हून अधिक मुलींचे अंघोळीवेळीचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यातून आठ मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. कालपर्यंत मोहालीतलं चंदीगड विद्यापीठ शांत होतं. पण, काल होस्टेलमधल्या हजारो मुली बाहेर पडल्या आणि घोषणाबाजी सुरू झाली. चंदीगड विद्यापीठात शिकणाऱ्या असंख्य मुलींचे अंघोळीवेळीचे व्हिडीओ व्हायरल झाले. मुलींचं होस्टेल असताना हे व्हिडीओ कुणी व्हायरल केले,याचा तपास सुरू झाला. तेव्हा एका मुलीचंच नाव समोर आलं. तीनं हे व्हिडीओ का शूट केलेत, याचा तपास केला असता या प्रकरणाला नवं वळणं मिळालं. तिला अटकही झाली. हे व्हिडीओ शूट करण्याचे प्लॅनिंग तिच्या एका मित्राचं होतं.

Published on: Sep 18, 2022 10:55 PM
Sharad Pawar : ‘त्या’ दोन नेत्यांमधले मतभेद पवारांनी 15 मिनिटांमध्ये दूर केले, नेमका वाद काय ?
आता चित्ता आणि पेंग्विनवरून राजकारण, शिवसेनेचं म्हणणं काय?