काही कळण्याआधीच पाच पाच जण ढिगाऱ्याखाली दबले गेले; तीन महिला मजुरांचा मृत्यू, कोठे झाली दुर्घटना!

| Updated on: Jun 07, 2023 | 7:38 AM

ही दुर्घटना विरारमध्ये घडली असून बांधकाम सुरू असलेल्या इमारतिची भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून दोन जखमी आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबई – मुंबईत मोठी दुर्घटना घडली. यात काही कळण्याच्या आतच पाच जमूर हे ढिगाऱ्याखाली दबले गेले. तर यात तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना विरारमध्ये घडली असून बांधकाम सुरू असलेल्या इमारतिची भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून दोन जखमी आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. तर या दुर्घटनेत नंदाबाई अशोक गव्हाणे (वय ३२) आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सर्व व जखमी मजूर हे नाका कामगार आहेत. ते मराठवाडा नांदेड, परभणी येथील मूळचे रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करत होते अशी माहिती मिळत आहे.

Published on: Jun 07, 2023 07:38 AM
“काहीजण कंत्राटदारांची भाषा बोलायला लागले”, मुख्यमंत्री शिंदे यांचा आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला
धक्कादायक ! पुण्यात पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार ?