चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो…पहिली झलक तर पहा डोळ्यांचे पारणे फिटतील…

| Updated on: Aug 31, 2024 | 2:39 PM

चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आज शनिवारी रस्त्यांवरील कमी वर्दळ पाहून मानाच्या गणपतींचे गणेश चित्रशाळा ते मंडप असे वाजत गाजत आगमन होत आहे. यावेळी वाहतूकीला मोठा फटका देखील बसला आहे.

 

चिंचपोकळीचा चिंतामणीचे आज दणक्यात आगमन झाले. गणेश चतुर्थीला अवघे आठ दिवस उरले असताना ही मिरवणूक मोठ्या जोशात निघाली आहे. या मिरवणूकीमुळे लालबाग आणि चिंचपोकळी परिसरातील वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या मिरवणूकीमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची गर्दी गेल्याकाही वर्षात वाढली आहे. या गणेशाची प्रतिमा यंदा 23 फूट उंचीचा आहे. मुंबईतील लालबाग गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, तर लालबागचा राजा आणि चिंतामणीचा चिंता हरणारा चिंतामणी या मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्तीपैकी एक असल्याचे म्हटले जाते. यंदा चिंतामणी गणेश मंडळाने जगन्नाथ पुरीची थिम आहे. यंदा 103 वे हे वर्षे आहे. या चिंचपोकळीच्या पुलावरुन ही मिरवणूकीला सुरुवात झाली असून भायखळ्याच्या बकरी अड्ड्यापासून मिरवणूकीला सुरुवात झाली असून सायंकाळी आठ वाजता ही मूर्ती गणेश मंडपात पोहचणार आहे.

Published on: Aug 31, 2024 02:38 PM
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी माफी मागणे हे महत्वाचे…शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळ जनक वक्तव्य
काही लोकांचा शौक असा की माझा…काय म्हणाले देवेंद्र फडणवीस