Worli | वरळीत पोस्टरबाजीवरून ठाकरे-शिंदे गटात वातावरण तापलं
शिंदे गटाने पोस्टर्स हटवल्याबद्दल अभिजित पाटील यांची स्थानिक पोलीस सहायक आयुक्तांकडे तोंडी तक्रार दिली होती. उत्सव काळात शिंदे गट वरळीत वातावरण बिघडवत असल्याबद्दल तक्रार दिली आहे.
वरळीत ठाकरे आणि शिंदे गटात पोस्टरबाजीवरून पुन्हा वातावरण तापले आहे. युवा सेना पदाधिकारी अभिजित पाटील यांनी वरळीत गणेश विसर्जनाच्या कृत्रिम तलाव व्यवस्थेचे लावलेले पोस्टर्स शिंदे गटाने हटवले आहेत. त्याजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखात घर देण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे पोस्टर्स शिंदे गटाने लावले. वरळीत अनेक ठिकाणी शिवसेनेने लावलेली पोस्टर्स हटवून त्याजागी लागली मुख्यमंत्र्यांच्या आभाराची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. युवा सेना पदाधिकारी अभिजित पाटील वरळी सागरी कोळी महोत्सवाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे वरळीत गणेश विसर्जन कृत्रिम तलावाचा उपक्रम राबवित आहे. शिंदे गटाने पोस्टर्स हटवल्याबद्दल अभिजित पाटील यांची स्थानिक पोलीस सहायक आयुक्तांकडे तोंडी तक्रार दिली होती. उत्सव काळात शिंदे गट वरळीत वातावरण बिघडवत असल्याबद्दल तक्रार दिली आहे.