‘…अब की बार फिर एक बार मोदी सरकार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, विरोधकांवर सडकून टीका
विरोधकांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे, त्यांना शिव्या देणे, त्यांची बदनामी करणे हाच असल्याचं म्हटलं आहे. मात्र या देशातील जनता ही सूज्ञ असून पुन्हा एकदा लोकांनी ठरवले अब की बार, फिर एक बार मोदी सरकार.
नवी दिल्ली, 19 जुलै 2023 | एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका करताना, विरोधकांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे, त्यांना शिव्या देणे, त्यांची बदनामी करणे हाच असल्याचं म्हटलं आहे. मात्र या देशातील जनता ही सूज्ञ असून पुन्हा एकदा लोकांनी ठरवले अब की बार, फिर एक बार मोदी सरकार. त्याचबरोबर ही लढाई आता केवळ पंतप्रधान मोदी यांची नाही. तर संपूर्ण देशाची लढाई आहे. ही भारताची आहे. त्यामुळे देश प्रगती करत असून आर्थिक आघाडीवर पुढे जात आहे. त्यामुळे इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजेच पंतप्रधान मोदी असेही घणाघात त्यांनी विरोधकांवर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी देशात 330 प्लस असं लोकसभेचं वातावरण दिसत असून महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकू असा दवा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.