टोमॅटोची सोन्याची झळाळी उतरली; येथे पंधरा दिवसात 75 टक्क्यांनी दरात घसरण
गेल्या काही दिवसानंतर शेतकऱ्यांना टोमॅटोने सुगीचे दिवस आणले होते. एक आणि दोन रूपये किलो जाणारा टोमॅटो हा १०० पार गेला होता. त्यामुळे अनेकांची ओरड ऐकू येत होती.
नाशिक : 17 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून कांद्याने नव्हे तर ग्राहकांच्या डोळ्यात टोमॅटोनं पाणी आणले होते. कधी नव्हे ते टोमॅटो 200 ते 300 रुपये किलो गेले होते. टोमॅटोचे गगनाला भिडलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांनी चांगले दिवस तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत होती. त्यामुळे अनेकांनी त्यावरून वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. याचदरम्यान आता टोमॅटोचे दर किरकोळ बाजारात टोमॅटोचे नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने नेपाळ येथून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता टोमॅटोची आवक नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेली पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या सरासरी बाजार भाव गेल्या पंधरा दिवसात त्र्याहत्तर टक्क्यांची घसरण झाली आहे. एक ऑगस्ट रोजी वीस किलोच्या टोमॅटोच्या क्रेट्सला सरासरी 2650 रुपये इतका बाजार भाव मिळाला होता. त्याच 20 किलोच्या टोमॅटोच्या क्रेट्सला सरासरी 951 रुपये इतका बाजार भाव मिळाल्याने टोमॅटोच्या बाजारभावाची लाली उतरल्याचे समोर येत आहे. तर आणखीन टोमॅटोचे बाजार भाव उतरणार नाही अशा भीतीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे.