Arvind Sawant : भाजप हा भेकडांचा पक्ष, अरविंद सावंतांनी उदाहणासहीतच सांगितले

| Updated on: Sep 10, 2022 | 9:05 PM

भाजपा हा भेकडांचा पक्ष झालेला आहे. मूळ प्रश्न सोडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. याकूब प्रकरण हे 2015 साली झाले आणि आता त्याबद्दल नको त्या चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात भाजपाचीच सत्ता होती. त्यावेळीच हे प्रश्न का उपस्थित केले गेले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : (Yakub Memon) याकूब मेमनच्या कबरीवर रोषणाई यावरुन (BJP Party) भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. किशोरी पेडणेकर यांनी तर राज्यपाल आणि याकूबचे काही एकत्रित छायाचित्रेच दाखवले. तर जेव्हा याकूबचे पार्थिव दिले गेले होते तेव्हा का भाजपाला जाग आली नाही. त्यामुळे आपली बाजू मांडण्यात हे कमी पडत असून या प्रकरणी आता भाजपाला भीती वाटू लागली असल्याचे (Arvind Sawant) शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. भाजपा हा भेकडांचा पक्ष झालेला आहे. मूळ प्रश्न सोडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. याकूब प्रकरण हे 2015 साली झाले आणि आता त्याबद्दल नको त्या चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात भाजपाचीच सत्ता होती. त्यावेळीच हे प्रश्न का उपस्थित केले गेले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Sep 10, 2022 09:05 PM
Chandrakant Patil : राज्यात सर्वकाही सुरळीत, जनतेची चिंता सोडा, चंद्रकांत पाटलांचा निशाणा कुणावर?
Ulhasnagar Yuva Sena | उल्हासनगरातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठिंबा