भाजप खासदारांनीच काढली पक्षाची क्षमता, म्हणाले, एका रात्रीत…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन आम्हाला या उमेदवाराला मतदान करा असा निरोप आला तर आम्ही चित्र पालटू शकतो.
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात ( nashik ) अधिकच चुरस निर्माण झाली आहे. यावरून भाजप खासदार सुजय विखे पाटील ( sujay vikhe patil ) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिक निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन आम्हाला रात्री जरी या उमेदवाराला मतदान करा असा निरोप आला तर एका रात्रीत आम्ही चित्र पालटू शकतो. एका रात्रीत उमेदवार निवडून येऊ शकतो याची अनुभूती सर्व जिल्ह्याला येईल. एका रात्रीत उमेदवार निडवून आणण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.
Published on: Jan 27, 2023 11:09 AM